वचकांचे पत्र:
आरोग्यदायी ,चैतन्यदायी व स्फूर्तीदायी अभ्यंग स्नान !ं
प्रति,
संपादक ,
कृपया प्रसिद्धीसाठी
उठा उठा दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली
भारत देश ज्याने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली. प्रत्येक दिनचर्येच्या कृतींमागील शास्त्र सांगितले. भारतामध्ये अनेक अशा परंपरा निर्माण झाल्या की ज्यामधून प्रत्येक व्यक्तीला आयुर्वेदातील विविध कृतींचा लाभ होईल. त्यापैकीच एक म्हणजे अभ्यंगस्नान !
आपण सर्वजण अभ्यंगस्नानाचे दिव्यत्व या दिवाळीला अनुभवूया.
आपणा सर्वांनाच माहिती आहे की, अभ्यंगस्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी म्हणजे आकाशात जेव्हा चांदण्या असतात तेव्हा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून शरीराला तेल लावून उटणे लावून केलेले स्नान. भारतामध्ये विशेषतः नवीन वर्षारंभ जसे गुढीपाडवा, दिवाळीतील तीन दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन(अमावस्या) व पाडवा(प्रतिपदा) या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. जे स्नान केल्याने पिंड म्हणजे आपले शरीर याचा अभ्युदय अर्थात उत्कर्ष होतो ते स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. शरीराला तेल लावून मर्दन म्हणजेच मालिश केली गेल्याने शरीरातील रक्तवाहिन्या मास पेशी या चैतन्याने, शक्तीने भारित होतात त्यांना शक्ती व नवचेतना मिळते. मालिश केल्यानंतर उटणे लावून कोमट पाण्याने स्नान केल्याने मिळणारे चैतन्य, स्फूर्ती आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवली आहे. आयुर्वेदानुसार मनुष्यातील चेतना शक्तीला जागृत करण्याचे अभ्यंगस्नान हे एक माध्यम आहे. त्यामुळे दिवाळीला तर आपण ते करू या.सोबत वर्षभरामध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यंगस्नान करण्याने होणारे लाभ वर्षभर आपण घेऊ या.चला तर मग घरामध्ये बच्चेकंपनी नहीत पर्यंत सर्वांनी या दिवाळीला तीनही दिवस अभ्यंगस्नान करून निर्माण होणारी स्फूर्ती, उत्साह, चैतन्य अनुभवूया!
– सौ. रोहिणी जोशी, संभाजीनगर