नंदुरबार – तालुक्यातील संजय गांधी योजना आणि इंदिरा गांधी योजनेसह वेगवेगळ्या नऊ योजनांच्या लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम तत्परतेने जमा करून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या योजनांच्या लाभार्थ्यांना सुखद धक्का देऊन दिवाळीची भेट दिली आहे. एकूण सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान धनादेश स्वरूपात तहसील कार्यालयामार्फत बँकेत जमा करण्यात आले.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ही माहिती देताना सांगितले की, नंदुरबारच्या तहसिल कार्यालया अंतर्गत संजय गांधी योजना शाखेमार्फत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना योजनानिहाय अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी दि. 28 आक्टोबर 2021 व दि. 29 आक्टोबर 2021 रोजी इंदिरा गांधी योजनेचे एकूण 6002400 (अक्षरी साठ लाख दोन हजार चारशे मात्र) तसेच, संजय गांधी व श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेचे एकूण 14043000 (अक्षरी – एक कोटी चाळीस लाख त्रेचाळीस हजार रु. मात्र) चे धनादेश बँकेत जमा करण्यात आले.
योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी अनुदान जमा करण्यासाठी तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन पाटील (नायब तहसिलदार, संजय गांधी योजना), प्रिती पाटील (अ.का.संजय गांधी योजना), मंगला वसावे (इंदिरा गांधी योजना म.स.) व चेतन सोनार (ऑपरेटर) यांनी कामकाज पाहिले.
जमा करण्यात आलेल्या धनादेशानुसार लाभार्थ्यांचे योजनानिहाय अनुदान खालीलप्रमाणे असणार आहे.