‘खादी’ने साधेपणाची टाकली कात; डिझायनर्सच्या मंचावर दिसला खादीचा आधुनिक ‘लूक’ 

नवी दिल्ली –  गांधीजींच्या त्यागाची, राष्ट्र-समाजाप्रती असलेल्या समर्पित भावाची आठवण करून देणारी तसेच साधेपणा, शुद्धता याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ‘खादी’ आता आधुनिक ड्रेस डिझायनरचा आकर्षण बिंदू बनला आहे. खादी पासून बनवलेल्या अत्यंत आधुनिक अशा 60 आकर्षक ड्रेस डिझाईन प्रमुख राष्ट्रीय बाजारात नुकत्याच  दाखल झाल्या.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) द्वारे नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे आयोजित खादी फॅशन शोच्या माध्यमातून खादीचे साधेपणा, शुद्धता आणि टिकाऊपणाचे सार दाखवण्यात आले. प्रसिद्ध डिझायनर आणि KVIC सल्लागार सुनील सेठी यांच्या नेतृत्वाखाली फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (FDCI) ने आयोजित केलेल्या या फॅशन शोमध्ये KVIC ने आयोजित केलेल्या अखिल भारतीय खादी डिझायनर्स स्पर्धेद्वारे निवडलेल्या 10 नवोदित फॅशन डिझायनर्सच्या 60 डिझाईन्सचे प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी पहिल्या 3 डिझायनर्सचाही सत्कार करण्यात आला. चेअरमन विनय कुमार सक्सेना म्हणाले की, या स्पर्धकांनी डिझाइन केलेले कपडे लवकरच खादी इंडिया आउटलेटवर डिझायनर वेअर म्हणून उपलब्ध केले जातील. खादीकडे तरुण पिढीला आकृष्ट करणं ही कल्पना आरामदायक, सहज कपडे आणि ट्रेंडी असलेल्या कपड्यांसह आहे.
डिझायनर स्वाती कपूर यांना सर्वात नैतिक आणि टिकाऊ कापडांपैकी एक म्हणून खादीचे चित्रण केल्याबद्दल 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. ब्लॉक प्रिंटिंग, हँड क्रोशेट आणि हँड एम्ब्रॉयडरी आणि इतर प्रकारच्या फॅब्रिक मॅनिप्युलेशनसह त्यांनी साध्या आणि सेल्फ चेकमध्ये खादीच्या मलमलच्या फॅब्रिकचा वापर केला.
डिझायनर ध्रुव सिंगला 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन द्वितीय उपविजेता घोषित करण्यात आले. कौशल सिंग आणि गौरव सिंग या दोन डिझायनर्सनी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे तिसरे बक्षीस जिंकले. कौशलने साध्या विणलेल्या खादीचा आणि निळ्या खादीच्या डेनिमचा वापर केला. प्रिंट आर्टवर्क उत्कृष्ट कलाकारांनी तयार केले होते, स्क्रीनमध्ये रूपांतरित केले आणि फॅब्रिकवर मुद्रित केले. डिझायनर गौरवने झिरो वेस्ट डिझाइन तंत्र आणि कॉन्ट्रास्ट स्टिच लाइन डिटेलिंगचा वापर करून खादी कॉटन फॅब्रिकचा वापर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!