सहकार भारतीचे 17 डिसेंबरला लखनऊ येथे राष्ट्रीय अधिवेशन

नंदुरबार – सहकारातून समृद्धीकडे नेणाऱ्या सहकार भारती अंतर्गत सहकार क्षेत्रात कार्यरत देशभरातील प्रतिनिधींचे देशपातळीवरील तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन लखनऊ येथे येत्या 17 ते 19 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार भारतीचे नाशिक विभागीय संघटक शिरपूर येथील दिलीप लोहार यांनी दिली.

सहकार भारती संस्थेची जिल्हा बैठक शनिवार दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी हाट दरवाजा परिसरातील तांबुलवेल सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत (दोंडाईचा) होते. सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कालिदास पाठक यांनी प्रास्ताविक करून बैठकीस प्रारंभ केला. बैठकीत मार्गदर्शन करताना दिलीप लोहार यांनी सांगितले की, सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सर्वसमावेशक सहकार भारतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल. विविध सहकारी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, महिला बचत गट यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार भारती कार्यरत आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीचे संचालन महासचिव के.डी. गिरासे यांनी केले. सहकार भारतीच्या जिल्हास्तरीय पहिल्याच बैठकीस दिलीप चौधरी (शिरपूर) राजेंद्र उमराव , ज्ञानेश्वर न्हावी, (शहादा) तसेच नंदुरबार जिल्‍हा संघटनमंत्री महादु हिरणवाळे, रोहिदास सौपुरे, प्रल्हाद भावसार, वामन चौधरी, सुनील चव्हाण, योगेश चव्हाण, मुकेश बारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!