तलवारबाजी पडली महागात; 18 वर्षीय तरूण अटकेत

नंदुरबार – आरडाओरड करीत तलवार फिरवून दहशत माजवून एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करण्याचा प्रकार अवघ्या 18 वर्षीय मुलाने घडवला. दहशत बसवण्याचा हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला असून उपनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल रविंद्र मराठे (वय १८ वर्ष ) राहणार गिरीविहार गेट भिलाटी नंदुरबार याने सिंधी कॉलनीत किंग्स मेन्स वेअर रेडीमेड कपड्याच्या दुकानाच्या शटरवर तलवारीने मारले. शिवाय त्याच तलवारीने दुकानासमोरील सी सी टी व्ही कॅमेरा फोडून नुकसान केले. जितेंद्र गुरुमूखदास किंगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याबाबत भारतीय कायदा कलम भादंवि ४२७ प्रमाणे गैर कायदेशीर हत्यार बाळगल्याच्या आरोपाखाली उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हवलदार राजेंद्र दाभाडे अधिक तपास करीत आहेत. आरोपीस उपनगर पोलिसांनी भादंवि क १४३, १४७ वगैरे गुन्हयात अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!