नंदुरबार – 50 अथवा 100 दिव्यांची नव्हे तर तब्बल ५०० दिव्यांची आरास करण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप स्मारक दीपोत्सवाच्या तेजाने न्हाऊन निघाले. दोन्ही स्मारकांवर दीपोत्वामुळे मन हरपणारे दृश्य दिसत होते. कोणताही गाजावाजा न करता शिवप्रेमी तरुणाईने येथे असे ऊपक्रम चालवले आहेत.
स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्रच्या वतीने सालाबादप्रमाणे दिवाळी निमित्ताने आज नंदुरबार शहरात शिवदिपोत्सव घेण्यात आला.आज छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप स्मारक येथे दिव्यांची आरास करण्यात आली. दोघे स्मारकांवर ५०० दिव्यांची आरास लावून स्मारक सजवण्यात आले. मागील ६ वर्षांपासून स्वराज्य निर्माण सेनेच्या माध्यमातून शिवदिपोत्सवचे आयोजन केले जात आहे. यावेळी स्वराज्य निर्माण सेनेचे स्वराज्यसैनिक, शिवभक्त, धारकरी बांधव उपस्थित होते.