नवी दिल्ली – रस्त्याने धावणाऱ्या एका स्कुटीचा अचानक स्फोट होऊन दोन जण जागीच मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली. याचे वृत्त डीएनए ने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या बातमीतील व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यातील दृश्य मनाला चटका लावणारे आहे. ही घटना पुद्दुचेरी येथे घडल्याचे डीएनए ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. सात वर्षीय मुलगा आणि त्याचा पिता स्कुटी वरून फटाके घेऊन जात होते त्यावेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती त्यात दिली आहे.
Firecrackers loaded on scooter explode, 2 killed #Diwali #caughtoncamera #ICYMI #DNAVideos pic.twitter.com/KYtkMGhRpT
— DNA (@dna) November 7, 2021