नंदुरबार: अक्कलकुवा शहरातील 5 व्यापाऱ्यांवर ३ लाख ४६ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याच्या पाठोपाठ तळोदा शहरातील दोन थकबाकीदारांवर महावितरण कंपनीने गुन्हा नोंदवला.
वीज महावितरणच्या अक्कलकुवा कक्ष कार्यालयाचे अभियंता गणेश कोरचा यांनी गुन्हे दाखल केले. 2 मे 2021 पासून 6 महिन्यात वापरलेल्या विजेची थकबाकी भरली नाही म्हणून गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोरचा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मानाराम केशव राम चौधरी यांनी 91 युनिट चा वापर केला. त्याचे देयक व दंडाची रक्कम मिळून 16 हजार 263 भरणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे मोहसीन खान रुस्तम पठाण यांनी 1554 युनिट वापराचे दंडासह 29 हजार 130 रुपये वारंवार संधी देऊन देखील भरले नाही. म्हणून दोघांविरुद्ध फसवणूक करून वीज चोरी केल्याचा भादंवि कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.