धुळे पोलिसांची मोठ्ठी कारवाई; 7 हजार किलो मांस जप्त, 17 गुरांनाही दिले जीवदान

धुळे – येथील चाळीसगाव रोड परीसरातील गोदामावर सहायक पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने अचानक छापेमारी करीत सुमारे 14 लाख रुपये किमतीचे 7 हजार किलो मांस जप्त केले. या कारवाईमुळे 17 जनावरांना देखिल जिवदान मिळाले.
धुळयाच्या आझादनगर तसेच चाळीसगाव रोड भागात मोठया प्रमाणावर गुरांची कत्तल सुरु असल्याच्या तक्रारी होत आहेत. पोलीस दलाने त्याची दखल घेत काल ही कारवाई घडवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना जामचा मळा भागात मोठया प्रमाणावर गुरांची कत्तल सुरु असल्याची माहीती मिळाली. तात्काळ योजना आखून या पथकाने गोदामावर छापा टाकला. त्यावेळी गुरांची कत्तल सुरु असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पथकाने या गोदामातुन 17 गुरांना जिवदान दिले व घटनास्थळावरुन 7 हजार किलो मांस जप्त केले आहे. याप्रकरणात अमजद खान अब्दुल अजिज , अच्छु ऊर्फ नजिमोदीन नुरोदीन काझी , वसीम शेख हुसेन शेख , साहेबोदीन कबीरोदीन काझी, सदाम शेख रशीद , असलम अयुब कुरेशी , अब्दुल रहेमान करीम खान , फिरोज खान अब्दुल अजिज , नईम सलिम कुरेशी, कुरेशी असलम मोहमद ईसमाईल , रसुल खान मोयोदीन खान , इुसनोदीन करीमोदीन शेख , इकबाल अयुब कुरेशी , अन्सारी अनस मोहमद अयुब , समीर शेख सलिम , नदीम ईकलाख कुरेशी , नाविद खान रशीद खान यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!