पोलीस भरती परिक्षार्थींना रद्द केलेल्या प्रश्नांची मिळणार भरपाई

नंदुरबार – जिल्हा पोलीस शिपाई भरती परीक्षेतील  प्रश्नपत्रिकेत चार प्रश्नांमधे त्रुटी आढळल्यामुळे परीक्षार्थींना त्यांच्याा गुणांची भरपाई दिली जाणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी याविषयी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, जिल्हा पोलीस शिपाई भरती-2019 मध्ये 25 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार दि. 14.11.2021 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 दरम्यान नंदुरबार शहरातील 11 परिक्षा केंद्रावर 100 गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आलेली आहे. सदरहू लेखी परिक्षेची आदर्श उत्तर तालिका (Modal Answer Key) संच निहाय ( A/B/C/D ) दि. 14.11.2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असुन त्याबाबतच्या उमेदवारांच्या काही तक्रारी/हरकत असल्यास दि.17.11.2021 रोजी 20.00 वाजेपर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत ई-मेल आय.डी. sp.nandurbar@mahapolice.gov.in/www.nandurbarpolice.org किंवा हेल्पलाईन नंबर- 9405626982 वर अथवा या कार्यालयात समक्ष मागविण्यात आल्या होत्या.
त्यानुसार काही उमेदवारांकडून प्राप्त तक्रारी/हरकती अनुषंगाने पडताळणी केली असता, प्रश्नपत्रिका संच निहाय ( A/B/C/D ) मधील खालील नमुद 01 प्रश्न असलेल्या उत्तरासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये छपाई दरम्यान त्रुटीआक्षेप असलेले प्रश्न बाद/रद्द करण्यात येत असून परिक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना सदरहू बाद केलेल्या 01 प्रश्नांचा 01 गुण देण्यात येत आहे.
प्रश्न पत्रिका संच आणि क्रमांक याप्रमाणे-  A -37, B -12,  C- 87, D- 62.
त्या अनुषंगाने, नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई 2019 लेखी परिक्षेसाठी उपस्थित असलेल्या 2132 उमेदवारांची सुधारीत गुणपत्रिका (Provisional Marklist) nashikpolicebharti.inwww.nandurbarpolice.org प्रसिध्द करण्यात आलेली आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!