नंदुरबार – स्पर्धेत अपयश आल्यानंतर खचून जायचे नसते. आपल्यातील उणीवा शोधायच्या आणि पुढील स्पर्धेसाठी अधिक सराव करायचा. तसे केले तर यश निश्चित मिळेल, असे विचार मांडतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की, तायक्वांदो खेळाडूंमध्ये शिस्तीचे पालन दिसून येत असून या खेळाच्या माध्यमातून एक उत्तम नागरीक होण्यासही मदत होणार आहे, असे प्रतिपादन केले.
येथील नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे न.पा.शाळा क्र.१ मध्ये जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर उपस्थित होते. तायक्वांदो जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले की, तायक्वांदोचे खेळाडू कठीण परिश्रम घेत असून त्यांच्यात ते यापुढे निश्चित राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील. जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची व प्राविण्य प्राप्त करण्याची पुरेपूर क्षमता आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत. यापुढे निश्चितच राष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू प्राविण्य प्राप्त करतील, असे जावेद बागवान म्हणाले. या स्पर्धेत ५० खेळाडूंनी सहभाग घेतला. यात क्षितीज अभंगे, ऊवेज मियॉं, सैय्यद शाहीद, सैय्यद यामिन, सैय्यद जुनेद, काझी सुफियान, साहील शेख, केशव पावरा यांची राज्यस्तरावर निवड झाली. हा संघ दि.३ ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान पालघर (मुंबइऱ्) येथे होणार्या राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत भाग घेणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साबीर शेख यांनी केले. तर आभार जावेद बागवान यांनी मानले.