धुळे – धुळे जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी आज 97. 36 टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार तालुक्यातून 98. 81 ,शहादा तालुक्यातून 94. 74, नवापुर तालुक्यातील 100 टक्के मतदान झाले आहे. तळोदा तालुक्यातून 86 . 33टक्के, अक्कलकुवा तालुक्यातून शंभर टक्के आणि अक्रनिमहाल येथून देखील शंभर टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
या निवडणुकीत वीस उमेदवार रिंगणात असून तीन माजी आमदार आपले भविष्य आजमावत आहे. धुळे जिल्हा बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. माघार अखेर 7 जागा बिनविरोध झाल्या. तर उर्वरित दहा जागा बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न अपयशी ठरल्याने जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. यात बँकेच्या 983 पैकी 957 सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात धुळे तालुक्यातून 97 टक्के, साक्री तालुक्यातून 97 तर शिरपूर तालुक्यातून 96 . 88 टक्के मतदान झाले. शिंदखेडा तालुक्यातून 86 . 67, नंदुरबार तालुक्यातून 98. 81 ,शहादा तालुक्यातून 94. 74, नवापुर तालुक्यातील 100 टक्के मतदान झाले आहे. तळोदा तालुक्यातून 86 . 33टक्के, अक्कलकुवा तालुक्यातून शंभर टक्के आणि अक्रनिमहाल येथून देखील शंभर टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.