11हजाराची लाच घेताना हवालदारास अटक; अँटी करप्शनची थेट मोलगीत धडक कारवाई

नंदुरबार – चॅप्टर केस संदर्भात 11 हजार रुपयांची लाच घेताना मोलगी (ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार) पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार रंगेहात पकडला गेला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आज आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती आणि त्याची दोन्ही मुले यांच्यावर जमिनीच्या वादातून अदखलपात्र गून्हा दाखल आहे. या अदखलपात्र गुन्ह्यातील चॅप्टर केस मधून दोन्ही मुलांची नावे कमी करण्यासाठी मोलगी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश सिताराम मेढे (वय 43 वर्ष) यांनी त्या व्यक्तीकडे 15,000/-रू लाचेची मागणी केली. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या व्यक्तीनेेे तक्रार दिली. दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी सापळा रचला. त्यावेळी तडजोडीअंती 11,000/- रू पंचासमोर हवालदार मेढे यांनी स्वीकारले.  म्हणून लगेचच पकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने(नाशिक परिक्षेत्र, नाशिक), अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे,  (अति.कार्यभार) व पोलीस उपअधीक्षक, धुळे (अति. कार्यभार नंदुरबार.) सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ यांनी हवालदार उत्तम महाजन, विजय ठाकरे, नायक दिपक चित्ते, अमोल मराठे, महिला पोलीस नायक ज्योती पाटील या पथका समवेत कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!