नंदुरबार – अखिल भारतीय साहित्य परिषद, श्रीजी वाचनालय आणि शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदवी स्वराज्य ऊभारणी करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला कार्य-संदेश उगवत्या पिढीच्या प्रत्येक तरूणाचे हृदय, बुध्दी आणि अंत:करणापर्यंत नेण्याचे कार्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. इतिहासाला दखल घ्यायला भाग पाडेल असे बाबासाहेबांनी केलेल्या त्या कार्याचे स्मरण या निमित्त केलेेे जाणार आहे. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून शहादा येथील विकास हायस्कूल मधील प्रा.डॉ.पुष्कर शास्त्री हे स्व.बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर बोलणार आहेत. येथील श्रीजी वाचनालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने शशिकांत घासकडबी, अभिजित खेडकर, श्री ਜੀ वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी,सौ.ऋता चौधरी, संतोष पाटील, दीपक कुळकर्णी, शिवशंभू प्रतिष्ठानचे डॉ.पुष्कर शास्त्री यांनी केले आहे.