ट्रॅक्टरच्या धडकेने मुलगा ठार; अन्य दोन गंभीर जखमी

नंदुरबार – तालुक्यातील खोक्राळे येथील धरणाच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका ट्रॅक्टरची धडक बसून दहा वर्षीय मुलगा मरण पावला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात या विषयी गुन्हा नोंद झाला आहे.
तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार चालक उदेसिंग रतनसिंग गिरासे, वय ३० रा. तामथरे ता. शिंदखेडा जि. धुळे हा वेगाने ट्रॅक्टर चालवत होता. त्यावेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या राज नागेश्वर भिल या १० वर्षेीय मुलाला जबर धडक बसली. छातीला जबर मुकामार बसल्याने तो अत्यवस्थ झाला. तर अंकुश रामभाऊ भिल आणि समाधान रामसिंग भिल या अनुक्रमे 16 व 18 वर्षे वयाच्या युवकांनाही जबर धडक बसून तेही गंभीर जखमी झाले. मजूर कृष्णा बंडू भिल यांच्यासह धावून आलेल्या लोकांनी तीनही जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. तिथे उपचार घेताना दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अन्य दोघे उपचार घेत आहेत. दरम्यान, क्रमांक नसलेले ट्रक्टर अविचाराने भरधाव वेगाने हयगईने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करीत चालवून ठोस मारून गंभीर दुखापती केल्याच्या आरोपाखाली कृष्णा बंडू भिल वय – ५१ व्यवसाय- मजुरी रा. खोक्राळे ता. नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक उदेसिंग रतनसिंग गिरासे, वय ३० रा. तामथरे ता. शिंदखेडा जि. धुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवलदार देविदास नाईक हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!