आकडे टाकून वीज चोरी; दोन जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार – घरगुती वापरासाठी चोरून कनेक्शन घेऊन 2 लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नंदुरबार तालुक्यातील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजश्री भरत पाटील कनिष्ठ अभियंता (नंदुरबार ग्रामीण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. फिर्यादीत म्हटल्या नुसार गंगाराम उत्तम गावीत रा.गुजर भवाली ता. जि. नंदुरबार यांनी तसेच नरोत्तम जाधव चौधरी रा.करजकुपा ता. नंदुरबार यांनी अधिकृत कनेक्शन न घेता स्वत:च्या घरी म. रा. वि. वि. कंपनीच्या लाईनवर अंदाजे २५ फुट वायरने आकडा टाकून बेकायदेशीर रित्या घराचे वापरासाठी वीज वापर करतांना आढळले. म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. तपास उपनगर पोस्टेला वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!