नंदुरबार – आज मी जे काही आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आहे. ओबीसी, एस.सी., एस.टी. आणि इतरांना जे प्रतिनिधित्व करता आले, ते संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळेच. म्हणून भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून त्याची वर्षभर जनजागृती झाली पाहिजे, असे प्रतिपादन खा.डॉ.हिना गावीत यांनी केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून अर्हत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधीत करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. खासदार डॉ.हिना गावीत तसेच जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावीत यांनी प्रारंभी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व संविधानाचे पुजन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. कार्यक्रमाचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी प्रमुख पाहुणे डॉ.हिनाताई गावीत व डॉ.सुप्रियाताई गावीत यांचा सत्कार केला. नंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी एस.ए.मिशन हायस्कुल इ.१० वी ची विद्यार्थिनी पुजा वसावे हिने संविधानाबद्दल तिचे मत व्यक्त केले. कॉ.अमोल पगारे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की संविधान हे प्रत्येक भारतीयासाठी लिहिले गेल आहे. म्हणून जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ते पोहोचविण्याचे काम प्रत्येक भारतीयाचे आहे.
कार्यक्रमाला राम साळुंके, स्वरुप बोरसे, सुरेंद्र ठाकरे, प्रविण वाघ, डी.के.नेरकर, संजु रगडे, मोहन खानवाणी, जितेंद्र पवार, ॲड.सुनिल जाधव, बापू साळवे, संतोष शिरसाठ, कमल कडोसे, ललित सुर्यवंशी, किरण गवळे, सुनिल महिरे, बिरारी आप्पा, चंद्रकांत भोई, माणिक माळी, राहुल रामराजे, रणविर पेंढारकर, भैय्या पिंपळे, श्याम साळुके, प्रविण मराठे, दिपक पेंढारकर, तुकाराम चित्ते, हेमंत बोरसे, दक्षा बैसाणे, रोजी बैसाणे, वंदना साळुके, संजीवनी महाले-बैसाणे, ज्योती साळुंके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.हर्षबोध बैसाणे, गणेश शिरसाठ, गणेश पवार, अंतराज गवळे, युसुफ पिंजारी, गौतम पानपाटील, सिद्धार्थ साळुके, सौरभ साळुके, अशोक खांडेकर, जितेंद्र खवळे, विजय खवळे, छोटू सोनवणे, दिनेश तेजी, जयपाल तमायचेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक सुभाष पानपाटील यांनी केले.