नंदुरबार – केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गँस आणि अनेक वस्तूंच्या दरात भाववाढ चालू ठेवल्यामुळे वाढलेल्या महागाई विरोधात नवापूर तालुक्यातील गाव पाड्यात जनजागृती घडवण्याच्या हेतूने नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष नाईक यांनी प्रभात फेरी काढून लोकांशी संवाद साधला.
काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, खेडोपाडी जाऊन जनजागृती करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनीया गांधी, व राहुल गांधी यांच्या तसेच महाराष्ट्र कॉग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार महागाई संदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम सुरु आहे. त्याच अंतर्गत नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान ठिकठिकाणी लोकांशी संवााद करण्यात येतो. याप्रसंगी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाकार्यध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हापरिषद शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक, जिल्हापरिषद सदस्य मधुकर नाईक, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष दामू बि-हाडे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गावीत, पंचायत समिती सदस्य ललीता वसावे, नगरपालिका गटनेता आशिष मावची, कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती भानुदास गावीत, कॉग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रहेमतखा पठाण, डॉ. नचिकेत नाईक, सरपंच नवलसिंग गावीत, तानाजी वळवी, सरपंच जयंत पाडवी, सरपंच अनिल वसावे, उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया, माजी नगरसेवक विनय गावीत, प्रा. संजय पाडवी, तुराब पठाण आदींसह कॉंग्रेस पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.