पणजी –
“एक आसमा कम पड़ता है, और आसमान मंगवा दो,
है बेसब्रा उड़ने में , मेरे पंख नीले रंगवा दो,
स्वप्न करोड़ों सत्य हो रहे है , अब उन का सत्कार करो,
निकल पड़ा है भारत मेरा , अब तुम जयजयकार करो.”
अर्थात …. “एक आकाश कमी पड़त असेल, तर आणखी एक आकाश आणा …..” प्रसिद्ध गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या पंक्ती उद्घृत केल्या.
गोवा येथे झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यानंतर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
प्रसून जोशी यांनी विविध चित्रपटांसाठी गीतलेखन केले असून त्यांची काही गीत खूप गाजली. यामध्ये तारे जमीं पर, रंग दे बसंती, हम तुम, फना, आकर्षण, दिल्ली 6, गजनी, नीरजा, मनकर्णिका या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक चित्रपटांमधली जोशी यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत.यावेळी त्यांनी युवा कलाकारांना मनातील गोंधळालाही जपले जपण्याचे आवाहन केले आणि ते पुढे म्हणाले की या अनेकदा या गोंधळातूनच उत्तम कल्पनांचा जन्म होतो.
उत्तम चित्रपट बनवण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो, म्हणूनच असे शॉर्ट कट घेऊन आपल्याला काहीतरी घडवता येईल या भ्रमात चित्रकर्मींनी राहू नये. असे त्यांनी उगवत्या चित्रकर्मींना सांगितले. कुंडीतील झाडांकडून मिळणाऱ्या तत्वज्ञानापेक्षा मोकळ्या हवेत वाढणाऱ्या वटवृक्षाकडून मिळालेले ज्ञान मी जास्त महत्वाचे मानतो असे सांगत देशात सुरु असलेल्या संघर्षांशी चित्रकर्मींनी बांधिलकी ठेवण्याचे प्रसून जोशी यांचे आवाहन केले.देशातील विविधतेला चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे” , असेही ते म्हणाले.
प्रसून जोशी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जाहिरात व्यावसायिक आहेत. सध्या ते जगातल्या सर्वात मोठ्या जाहिरात कंपन्यापैकी एक असलेल्या मॅककॅन वर्ल्डग्रुपचे अशिया-पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष आहेत आणि भारतामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. त्यांना कान्स येथे गोल्डन लायन पुरस्कार मिळाला आहे, तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने त्यांना ‘यंग ग्लोबल लीडर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.