टपाल कार्यालयातही मिळतील पॅनकार्ड नोंदणी, बस, विमानसेवा, रेल्वे तिकिट बुकिंग, फास्ट टॅगसह विविध सेवा

पॅनकार्ड नोंदणी, बस, विमानसेवा, रेल्वे तिकिट बुकिंग, फास्ट टॅगसह विविध सेवा टपाल कार्यालयात मिळतील
नंदुरबार –  भारतीय डाक विभागांतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील डाक घर आणि शाखा डाक घर येथे सेवा सीएससी (आपले सरकार सेवा केंद्र) अंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मोबाईल बिल भरणे, वीज बिल भरणे, सर्व प्रकारचा विमा हप्ता भरणे, गॅस नोंदणी करणे, नवीन पॅन कार्ड नोंदणी, बस, विमानसेवा, रेल्वे तिकिट बुकिंग, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, फास्ट टॅग आदींचा समावेश आहे. या सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पी. आर. सोनवणे, प्रवर अधीक्षक, डाकघर, धुळे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
27 डिसेंबर रोजी डाक अदालत
  महाराष्ट्र आणि गोवा राज्यांशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई येथे आयोजित केलेल्या 117 व्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे.
या डाक अदालतीत टपाल वस्तू,  मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेंबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि ) तथा सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, जीपीओ इमारत, दुसरा माळा, मुंबई यांचेकडे 10 डिसेंबर 2021 पर्यंत दोन प्रती सह अथवा तत्पुवी पोहोचे अशा बेताने पाठवावी. असे मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई  यांनी कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!