नंदुरबार अपडेट (आरटीपीसीआर)
(11 डिसेंबर 2021 रात्री पर्यंत)
एकूण 187 पैकी 2 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह. तळोदा येथील 2 जणांचा यात समावेश.
सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण 7 रुग्ण.
जिल्ह्यात आज पर्यंत घेतलेले एकूण स्वँब 2लाख 49 हजार 195
आढळलेले एकूण covid-19 रुग्ण – 37 हजार 565
बरे झालेले एकूण रुग्ण 36 हजार 609
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू 951
——————–
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासांमध्ये देशात 8,503 नव्या लोकांना कोविडची बाधा झाल्याची नोंद आहे. भारतामध्ये सध्या कोविड उपचाराधीन रूग्णसंख्या 94,943. आत्तापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या 0.27टक्के हे प्रमाण आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.72 टक्के आहे. गेल्या 26 दिवसांपासून हा दर एक टक्क्यांपेक्षाही कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.66 टक्के नोंदवला गेला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 74,57,970 मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी 7.00 वाजता प्राप्त झालेल्या अंतरिम अहवालामधील आकडेवारीनुसार भारतामध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने आता 131.18 कोटींचा टप्पा (1,31,18,87,257) ओलांडला आहे. देशभरामध्ये 1,36,76,290 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 7,678 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे देशात महामारीला प्रारंभ झाल्यापासून या आजारातून पूर्ण बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 3,41,05,066 झाली आहे.
परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर 98.36 टक्के झाला आहे. हा दर मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर आहे.