स्वतंत्र सोलर जलकुंभाचे काम पूर्ण; वैंदानेतील आदिवासी वसाहतीचा पाणीप्रश्न सुटला

नंदुरबार – तालुक्यातील वैंदाने येथे आदिवासी वस्तीत सोलर पॅनलवर चालणारी पाण्याची टाकी बसवण्यात आल्याने या वसाहतीला आता नळपाणी योजनेचा लाभ मिळून घरपोच पाणी मिळू शकणार आहे.
नंदूरबार तालुक्यातील वैंदाने येथे आदिवासी विकास विभाग अंतर्गत पंचायत समिती स्तरावरून 15 व्या वित्त योजना अंतर्गत हे काम करण्यात आले. प्रथमच येथील आदिवासी वस्तीत ही 3000 लिटर क्षमतेची टाकी ऊभारण्यात आली आहे. सोलर पॅनलवर  चालणाऱ्या या पाण्याचा टाकीमुळे जवळपासच्या  आदिवासी बांधवांना  सार्वजनिक नळाच्या माध्यमातून पाण्याची सोय होणार आहे. आदिवासी बांधवांनी या बद्दल आनंद  व्यक्त केला. यावेळी वैंदाने  गावाचे सरपंच संजय पवार, अभियंता आकाश  होडगर  तसेच भरत पाटील, निलेश  पाटील, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!