नंदुरबारच्या डॉ.रेखा चौधरी यांची पंतप्रधानांच्या ट्विटर टिमने घेतली दखल; राज्यपालांनीही केले पुस्तक प्रकाशन

नंदुरबार – येथील प्रसिद्ध उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन आणि भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत (Ambassodor) डॉ. रेखा चौधरी लिखित “इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस”  (भारताचा प्राचीन आरोग्याचा वारसा (निसर्गाचा सर्वात शुद्ध आदिवासी खजिना)) या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.

शुक्रवार दि.10 डिसेंबर 2021 रोजी “जागतिक डिजिटल डिटॉक्स डे 2021” निमित्त आयोजित सोहळ्यात हे प्रकाशन पार पडले. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आदिवासी समाजावर पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ. रेखा चौधरी यांचे अभिनंदन केले. चौकटीच्या बाहेर विचार केल्याबद्दलही त्यांचे कौतुक केले. जागतिक डिजिटल डिटॉक्स दिवसाची स्थापना ही पुन्हा एक अनोखी संकल्पना असून तंत्रज्ञानाचा अधिक सजगपणे वापर करण्यास प्रोत्साहित करून तंत्रज्ञान क्रांतीची आशा निर्माण केली आहे.   रेखा चौधरी यांचा गावापासून ग्लोबल असा प्रवास पाहून मला अभिमान वाटतो ; असेही राज्यपाल म्हणाले.
     दरम्यान #DrRekhaChaudhari ट्विटर मोहिमेचे देखील दर्शकांनी खूप कौतुक केले आणि तिला टॉप 1 वर ट्रेंड करून सकारात्मक प्रतिसाद दिला. #DrRekhaChaudhari ट्विटर मोहिमेचे पंतप्रधान मोदी जी डिजिटल ट्विट टीमने देखील विशेष दखल घेतली आणि त्यांनी डॉ.रेखा चौधरी यांचे खास अभिनंदन केले.
पुरस्कार सोहळ्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मान्यवरांना संबंधित क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते पुरस्कारप्राप्त असे –
स्मिता ठाकरे (सामाजिक आणि मनोरंजन उद्योजक ऑफ द इयर), अर्चना नेवरेकर (महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्या, मराठी उद्योग), निशा जामवाल (वर्षातील सर्वोत्कृष्ट ब्रँड सल्लागार), विकास मित्तल (बिझनेस आयकॉन ऑफ द इयर),  रितू दत्ता (वर्षातील सर्वोत्कृष्ट सामाजिक व्यक्तिमत्व), आहना कुमरा (वर्षातील फिट अभिनेत्री), पियुस जैस्वाल (महिला सक्षमीकरणाचे बदल निर्माता), सिमरन आहुजा (वर्षातील सर्वोत्कृष्ट AMCEE),  स्मिता जयकर (उत्तम आध्यात्मिक तज्ञ guru).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!