वाचकांचं मत :
आपत्काळात करावयाची सिद्धता
मा. संपादक,
कृपया प्रसिध्दी करिता,
आपत्काळ म्हणजे संकट काळ. सध्या चालू असलेल्या रोगराईमुळे, पुरामुळे बदललेली परिस्थिती ,भुस्स:खलन ,वातावरणातील अनपेक्षित बदल हे सर्व संकट काळाचे लक्षणे असल्याचे द्योतक आहेत .त्यात प्रत्येकाने विविध स्तरावर सिद्ध राहणे आवश्यक आहे . जसे व्हायचे तसे होईल ही मानसिकता नको. अन्नावाचून उपासमार होऊ नये म्हणून काय काळजी करावयाची हे मागील लेखात आपण पाहिले , पुढील काही वर्षे पुरेल इतका अन्नधान्य साठा करणे ,गॅसची टंचाई लक्षात घेऊन सौरचूल ,बायोगॅस सारखी व्यवस्था करणे ,अन्न, भाजीपाल्याची लागवड करणे आवश्यक आहे .विविध टिकाऊ वस्तू ,पदार्थ साठवणे .पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून विहीर खणणे, पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाक्या बसवणे ,सोलर पॅनल बसवणे म्हणजे विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर त्याला पर्यायी व्यवस्था शोधणे. सौर उर्जेवर चालणाऱ्या गाड्या घेणे. सायकल, बैलगाडी ,हात गाडी खरेदी करणे. रुग्णाला लागणाऱ्या वस्तू ,शिवणकामाच्या वस्तू ,दुरुस्ती साठी लागणारे सुटे भाग, आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहून त्यानुसार पूर्व सिद्धता करणे. कुटुंबातील प्रत्येकाने किंवा एकाने तरी “प्रथमोपचार प्रशिक्षण” घेणे ,”अग्निशमन प्रशिक्षण घेणे”, “स्वसंरक्षण प्रशिक्षण” घेणे, सध्या काळाची गरज बनलेली आहे .आपतकाळाची सिद्धता करताना मानसिक ,कौटुंबिक, आर्थिक स्तरावर करावयाच्या वेगवेगळ्या सिद्धता ,सामाजिक बांधिलकी, महत्त्वाची कागदपत्रे ,भ्रमणभाष संबंधित सिद्धता अशा वेगवेगळ्या स्तरावरील सिद्धता कराव्या लागणार आहे.
– डॉ.सौ. संगीता जाधव, संभाजीनगर