मृत व्यक्तीच्या नावे आधार कार्ड बनवून बेकायदेशीर जमीन विक्री करणाऱ्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

 

नंदुरबार – मरण पावलेल्या व्यक्तीच्या छायाचित्राचा दुरुपयोग करीत तो व्यक्ती आपणच असल्याचे भासवून बनावट आधार कार्ड बनवले शिवाय नंदुरबार येथील दुय्यम निंबधक कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार देखील केले. हा सगळा प्रकार जिद्दीने कागदपत्रांवरील नोंदी तपासून सुशिक्षित विवाहित तरुणीने उघडकीस आणला व आजोबांच्या नावे फसवणूक केल्याचा गुन्हा देखील नोंदवला.

आधार कार्ड बनवण्याचा शासकीय प्रक्रियेतील गोंधळ या प्रकरणाने अधोरेखित झाला आहे. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या विवाहित तरुणीचे नाव मनिषा चेतन अहिरे, वय २५, रा.भागापुर (ब्राम्हणपुरी), ता.शहादा असे आहे. चित्रकथी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात मुलींना शिक्षण देण्याचे प्रमाण अजूनही अल्प आढळते. तथापि मनीषा अटक (अहिरे) या शिक्षीत असल्यामुळे आजोबांच्या मालकीचा नंदुरबार येथील प्लॉट परस्पर विक्री झाल्याचे प्रकरण त्यांना उघडकीस आणता आले. 2008 साली त्यांचे आजोबा पुंजाराम राघो अटक यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी नंदुरबार शहरात त्यांनी जमीन घेतलेली होती. ती जमीन विक्री झाल्याचे अलीकडेच मनीषा यांना समजले. तेव्हापासून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. प्रारंभी शासकीय कार्यालयातून आणि संपर्कातील व्यक्तींकडून पुरेसे उत्तर मिळाले नाही. समाधान कारक स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे त्यांनी सर्व स्तरावर धाव घेत अखेर प्रकरण उघडकीस आणले. आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेतील कमतरतांचा या व्यक्तीने दुरुपयोग केला असे यावरून स्पष्ट होते.

 

या महिलेने याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे आजोबा पुजांराम राघो हे मयत आहेत. असे असतांना आजोबांचे बनावट आधारकार्ड बनवून संगनमत करुन फकिरा मोतीराम जाधव यांनी स्वत:ला आजोबांच्या जागेवर उभेकरुन ‘पुजांराम अटक’ नाव धारण केले व पुंजाराम असल्याचे भासवले.

नंदुरबार शिवारातील बिन शेती सर्वे क्रं- २०३ / २/२, २०४ / २ २०४/२/२ (संगणकिय क्र ६८२) हेमंत नगर मधील प्लॉट क्र.३० चे क्षेत्रफळ २०८ चौरस ही मिळकत दि. २ जून २०२० रोजी व दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी बेकायदेशीर खरेदी विक्री करुन फसवणूक केली, असे म्हटले आहे. यावरून फकिरा मोतीराम जाधव रा- भोणे ता जि- नंदुरबार, अनिता प्रदीप भावसार, संगिता सुनिल भावसार दोघे रा- दोडांईचा ता शिंदखेडा, जगदीश भिक्कन चित्रकथे रा. खापर ता- अ कुवा, भरत बन्सीलाल रघुवंशी, शिंतरे मुगेस दोघे रा. नंदुरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!