कत्तलीसाठी चाललेल्या गायींना अपघात, मालेगावच्या फरार चालकावर गुन्हा दाखल; वाहनासह गायी जप्त

नंदुरबार – निर्दयपणे बांधून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गुरांची गाडी भरधाव वेगात जात असताना उलटून अपघात झाला. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन आणि जखमी जनावरे तसेच टाकून पसार झालेल्या मालेगाव येथील चालकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच बरोबर ६६ हजार रुपये किमतीच्या ४ जर्सी गायी, २ बैल आणि ३ लाख रुपये किमतीची बोलेरो गाडीही पोलिसांनी जप्त केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजता नवापूर त पिंपळनेर मार्गावर वडकळंबी गावाच्या पुढे हि-या बोदल्या गावीत रा. प्रतापपुर ता. नवापूर यांच्या उसाच्या शेताजवळ MH-MH-०२ YA-५२३८ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो गाडी अपघात होऊन उलटली. या गाडीत ४ गायी व २ बैल असे एकूण ६ गोवंश जनावरे बेकायदेशिर रित्या क्रूरपणे वाहनात कोंबून भरलेले होते. घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता पोलिसांना संबंधित वाहन चालक चारापाण्याची सोय न करता त्या गुरांना अपंगत्व येईल व ईजा पोहचेल अशा रितीने कत्तल करण्याच्या ईरादयाने घेवून जात असल्याचे आढळून आले. तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात करून अपघातग्रस्त वाहन जनावरासह जागीच सोडून चालक पळून गेला होता. म्हणून पोलीस हवालदार विकास पाटील यांच्याा फिर्यादीवरून अब्दुल मलिक मोहम्मद अक्तर वय २७ रा एकता नगर, बजंरगवाडी,  मालेगाव ता.मालेगाव, जि.नाशिक याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे या आरोपाखाली भादंवि कलम २७९ सह मो. वा. का. क. १८४,१३४, १८७ सह महा. पशु संरक्षण अधि. १९७६ चे १९९५ चे कलम ५ (५) (ब) सह प्राण्यांना छळ प्रति अधि. १६६० चे कलम ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस हवालदार प्रतासिंग वसावे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!