नंदुरबार – मध्यरात्री अचानक संशयास्पद ओमनी कारची झडती घेतली असता पावणे दोन लाखाचा गुटका पान मसाला व तंबाखू बेकायदेशीर वाहतूक करताना आढळला. म्हणून ओमनी कारसह हा मुद्देमाल जप्त करीत एका जणांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
कुभांरपाडा मार्गे विसरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी संशयावरून झडती घेतली असता GJ ०५ AR ४८११ या ओमनी कारमधे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखुजन्य विमल पान मसाला गुटख्याचा अवैधरि बेकायदेशीर साठा आढळला. लगेचच कारवाई करून १ लाख ५१ हजार २०० रु किमतीचे २१० नग विमल पानमसाला, ४१ हजार ५८० रुपये किमतीचे २१० नग तंबाखु, ९० हजार रुपये किमतीची एक ओमनी कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित गुटखा वाहतुक करतांना आढळला म्हणून पोलिस शिपाई पिंटु पावरा यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यावरून साजन परसराम अहुजा वय ३० रा नारायणपुर रोड धडधडया, ता. नवापुर ह्याच्याविरुध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात भादंवि ३२८,१८८,२७२, २७३ सह अन्न सुरक्षा मानके अधि २००६ चे क २६ (२) (४) ३० (R)(3T) प्रमाणे प्रतिबंधित गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस हेडकॉन्स्टेबल परदेशी हे अधिक तपास करीत आहेत. पोलीस शिपाई येवले अधिक तपास करीत आहेत.