(योगेंद्र जोशी)
धुळे – केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री ना.मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते काल दि.26 डिसेंबर 2021 रोजी दोंडाईचा नगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या विशेष रस्ते दुरूस्ती योजनेंतर्गत 10 कोटी रूपये खर्चून तयार करण्यात आलेले कॉक्रिटचे रस्ते, मुस्लीम समाज सामाजिक सभागृह, गरीब नवाज कॉलनीत विकसित केलेल्या ओपन स्पेसचा लोकार्पण सोहळा यासह दोंडाईचाचे जागतिक किर्ती लाभलेले शल्यचिकीत्सक डॉ.रविंद्रनाथ टोणगांवकर मार्गाचे नामकरण आणि जामा मशिदीजवळील एकता चौकाचे भूमिपूजन, असे भरगच्च विविध कार्यक्रम पार पडले. त्याप्रसंगी केलेल्या भाषणातून मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी चौफेर फटकेबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.
दोंडाईचातील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनात त्यांनी सहभाग घेण्याबरोबरच जाहीर सभांनाही त्यांनी संबोधित केले. त्यावेळी नक्वी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी “कपात , दलाली , भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि जातीयवादाचे गतिरोधक ” उद्ध्वस्त करून “सुप्रशासनाच्या महामार्गावर” देशाला पुढे नेत आहेत. “दंगल आणि दहशतीचे राजकारण” मोदी युगाने “सन्मानाने विकासाचा निर्धार” करून उधळून लावले आहे. “सर्वसमावेशक सक्षमीकरण” हा “राष्ट्रधर्म” आहे आणि “तुष्टीकरणाशिवाय सक्षमीकरण” ही मोदी सरकारची “राष्ट्रनिती” आहे. मोदी सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेतील समान भागीदार बनवले आहे, असे नक्वी यांनी सांगितले.
नक्वी म्हणाले की, मोदी युग हे ‘इक्बाल’ (अधिकार), ‘इन्साफ’ (न्याय) आणि ‘इमान’ (अखंडतेचे) युग आहे. सर्व आघाडीवर लढा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे “समस्या निवारक नेतृत्व ” आपल्याकडे आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि राज्यसभेतील उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, उपगराध्यक्ष नबु पिंजारी, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, जय अदितसिंह रावल, भाजपा शहाराध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती निखील जाधव, नगरसेवक खलील बागवान, इरफान पिंजारी, सुफीयान तडवी, रवि उपाध्ये, किशनचंद दोधेजा, नरेंद्र गिरासे, जितेंद्र गिरासे, करणसिंह देशमुख, माजी बांधकाम सभापती जितू गिरासे, भरतरी ठाकुर, कृष्णा नगराळे, संजय तावडे, माजी विरोधी पक्षनेता विजय मराठे, प्रदिप कांगणे, युसुफ कादियानी, प्रा.इशरतबानो शेख, ईस्माईल पिंजारी, जमील कुरेशी, बिसमिल्ला बागवान, नाजिम कुरेशी, भिकन बागवान, अनिल सिसोदिया, संजय चंदने, आदी मान्यवर उपस्थित होते. कुठेही भेदभाव न करता आमदार जयकुमार रावल यांनी विकास केल्याबददल त्यांचे यावेळी ना.नकवी यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे संत्रसंचालन अहमद शेख यांनी केले तर आभार प्रा. शेख यांनी व्यक्त केले.
गेल्या 7 वर्षात आमच्या सरकारने 2 कोटी 20 लाख गरीबांना घरे दिली आहेत; 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना “किसान सन्मान निधी” देण्यात आला आहे. गरीब वर्गातील सुमारे 9 कोटी महिलांना “उज्ज्वला योजने” अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे;त्यातील 38 टक्के महिला हया अल्पसंख्याक समाजाच्या होत्या. 32 कोटींहून अधिक लोकांना “मुद्रा योजने” अंतर्गत स्वयंरोजगारासह विविध आर्थिक उपक्रमांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे; 44 कोटींहून अधिक लोकांना “जन धन योजने”चा लाभ मिळाला आहे ; 44 कोटी जनधन खात्यांमध्ये 32 टक्के लाभार्थी देखील अल्पसंख्याक होते .यावरून मोदी सरकार सबका साथ ,सबका विकास, हे धोरण यशस्वीपणे राबवित आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. देशभरात “स्वच्छ भारत अभियान ” अंतर्गत 13 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत;”आयुष्मान भारत” योजनेअंतर्गत 2 कोटींहून अधिक लोकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले असून या सर्वांचा लाभ अल्पसंख्यांकांनाही मोठ्याप्रमाणात मिळाल्याचे नक्वी यांनी सांगितले.