नंदुरबार – येथे प्रथम हिंदुराष्ट्र प्रणेता वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांची ८८१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त उपस्थितांना प्रथमच महाराजा खेतसिंह यांच्या राष्ट्र कार्याची माहिती ऐकायला मिळाली व ऊपस्थित युवक त्यामुळे प्रभावित झाले.
गढ कुंढार नरेश हिंदू अधिपती झुजोतिखन्ड ( वर्तमान बुंदेलखंड) भूतकालीन शासक विर शिरोमणी महाराजा खेतसिंह जी यांची ८८१ वी जयंती निमित्त नंदुरबार खंगार समाजातर्फे विविध सामाजिक उपक्रम घेतले गेले. यानिमित्त बाहेर पुरा हाट दरवाजा येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि राष्ट्रप्रेमी, समाजसेवी सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरवात बाप्पाच्या आणि खंगार कुलदेवी मातेच्या आरतीने करण्यात आली. समाजातर्फे राष्ट्रपुरुष महाराजा खेतसिंह यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर हिंदू अधिपती महाराजा खेतसिंह यांचा जीवनपट, कार्यवर्णन आणि शौर्यगाथेची अमूल्य माहिती श्री सुमित परदेशी यांनी दिली. तर राष्ट्रधर्म जागृतीपर डॉ सतीश बागुल यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. यानंतर समाजातर्फे सार्वजनिक ठिकाणी अन्नदान करण्यात आले. यासह शनिमंदिर परिसरात वरिष्ठांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अशा रीतीने एकत्रितरित्या राष्ट्रधर्म आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात माजी नगरसेवक वरत्या वळवी, हिंदू जनजागृती समितीचे प्रा डॉ सतीश बागुल, शिवराणा प्रतिष्ठानचे मुन्नाभाई ,विकी मोची आणि इतर सदस्य, नवजीवन व्यायाम शाळेचे विजय सामुद्रे आणि इतर सदस्य उस्फूर्तपणे सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश खंगार यांनी तर आभार प्रदर्शन श्री महेंद्रसिंह खंगार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अण्णा परदेशी, श्री महेंद्रसिंग खंगार, श्री मनोज खंगार, हर्षल परदेशी, श्री भूपेंद्र खंगार, जितु मराठे, सुमित परदेशी, सचिन परदेशी, श्री मोहन खंगार, लल्ला परदेशी आणि परेश परदेशी यांनी परिश्रम घेतले.