ओमायक्रॉन: देशात 781, महाराष्ट्रात 167 रुग्ण

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 781 झाली आहे. लवकरच सहस्त्राच्या घरात ही संख्या जाणार असे यावरून दिसते. दरम्यान, महाराष्ट्रात ओमायक्रॉन वाढ झपाट्याने होत असल्याचे म्हणता येत नसले तरी महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या 167 झाली आहे. राज्यनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-

कोविड-19 संदर्भातली अद्ययावत स्थिती

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 143.15 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या  77,002

एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण  0.22%; मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.40%; मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक दर

गेल्या 24 तासांत 7,347 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली  3,42,51,292 वर

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 9,195 नवे रुग्ण

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (0.79%)  गेले 86 दिवस हा दर 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.68%) गेल्या 45 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी

आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.52 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती

क्रम संख्या राज्य ओमायक्रॉन रुग्ण संख्या रुग्णालयातून बरे झालेले
1 दिल्ली 238 57
2 महाराष्ट्र 167 72
3 गुजरात 73 17
4 केरल 65 1
5 तेलंगाना 62 10
6 राजस्थान 46 30
7 कर्नाटक 34 18
8. तमिल नाडु 34 16
9. हरियाणा 12 2
10. पश्चिम बंगाल 11 1
11. मध्य प्रदेश 9 7
12. ओडिसा 8 0
13. आंध्र प्रदेश 6 1
14. उत्तराखंड 4 0
15. चंडीगढ़ 3 2
16. जम्मू-कश्मीर 3 3
17. उत्तर प्रदेश 2 2
18. गोवा 1 0
19. हिमाचल प्रदेश 1 1
20. लद्दाख 1 1
21. मणिपुर 1 0
  कुल 781 241

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!