56 झिंगाट चालकांचे परवाने रद्द ; 31 डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधिक्षकांनी पुन्हा दिला ईषारा

नंदुरबार – आगामी नववर्षाचे पूर्वसंध्ये दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चार चाकी स्वार आढळून आल्यास त्यांचेवर अधिक कठोर कारवाई करून लायसन्स निलंबित करणेची कारवाई करण्यात येईल, असे सांगत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी खास ईषारा दिला आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पुढे सांगितले की, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन आहे की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जिवितास देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दरम्यान, रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये झालेली वाढ लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरुध्द् विशेष मोहिम चालूच ठेवली आहे. आतापर्यंत 170 मद्यपी चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून 56 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. तसेच भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे; असेही अधीक्षक पाटील म्हणाले.
दरम्यान,  नंदुरबार शहर 21. उपनगर 05, नंदुरबार तालुका 10. विसरवाडी 28, नवापुर 24, शहादा 10, सारंगखेडा-06, म्हसावद-06. धडगाव-10. अक्कलकुवा-09, तळोदा 08 मोलगी- 07, शहर वाहतुक शाखा 26 असे एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले. त्यातील 08 वाहन चालकांचे लायसन्स यापुर्वी 03 महिने व 06 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले होते.
  दिनांक 30/12/2021 रोजी यातील उर्वरीत 30 वाहन चालकांचे लायसन्स निलंबन प्रस्ताव तसेच रस्ते अपघातातील पादचारी, दुचाकी वाहन चालक व इतर अपघातांच्या 134 गुन्ह्यातील अपघात करुन पळुन गेलेल्या वाहन चालकांचा शोध घेवुन 26 वाहन चालकांचे लायसन्स निलंबन प्रस्ताव असे एकुण 56 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!