34 हवलदार बनले साहेब! पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नववर्षाची अनोखी भेट देत सहा.उपनिरीक्षकपदी केली पदोन्नती

नंदुरबार – जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
वर्षानूवर्षे पोलीस दलात परिश्रम करून पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदोन्नती देणाऱ्या संबंधीत शाखेचे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमंलदारांना पदोन्नती देण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या पूर्वसंध्येस 34 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (A.S.I.) या पदावर पदोन्नती देण्यात आली.
 नववर्षाच्या बंदोबस्तात सर्व अधिकारी व अमंलदार व्यस्त असतांना पोलीस हवालदारांना संध्याकाळी अशी पदोन्नती झाल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अमलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकूण 34 पोलीस हवालदारांना सेवा जेष्ठतेनुसार सहा. पोलीस उप निरीक्षक (A.S.I.) पदोन्नती देऊन नववर्षाची जणू भेटच दिलेली आहे.
पोलीस दलात सुमारे 30 ते 35 वर्षे अथक परिश्रम घेऊन सेवा करणाऱ्या अमंलदारांचा सहा. पोलीस उप निरीक्षक हा पदोन्नतीचा जवळ-जवळ शेवटचा टप्पा असतो त्यानंतर बहुतेक अमंलदार हे पोलीस दलातुन सेवानिवृत्त होत असतात. पोलीस अधक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी 34 पोलीस हवालदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक (A.S.I.) या पदावर पदोन्नती दिल्यामुळे पोलीस हवालदारांना पोलीस दलात बजावलेली सेवा सफल झाल्यासारखे वाटले.
पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अमलदारांना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदोन्नती बाबत अभिनंदन करुन नव वर्षाच्या व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 पदोन्नती झालेले अमंलदारांची नावे अशी –
     1) पितांबर रतन पाडवी 2) राजु जयसिंग जाधव 3) लक्षमण गजमल कोळी 4) मुंगल्या जत्र्या पाडवी 5) हर्षल पंडीत रोकडे (6) विरसिंग बापु वळवी 7) गिरधन महारु सोनवणे 8 ) पानाजी फत्तु वसावे (9) फुलसिंग मांजय पटले 10) मुकेश राधीया गावीत 1) मोहनलाल रेवजी वळवी 12 ) विठ्ठल विका पावरा 13) राजेंद्र शंकर दाभाडे 14 ) राजेश सखाराम ठाकरे 15)राजेंद्र निळकंट चव्हाण 16 ) सुपुड़ रुपसिंग पाडवी 17) गिरधर भिका माळीच 18) नरेंद्र करणसिंग वळवी 19) सुकलाल जतन भिल 20) राजु देविदास पारोळेकर 21 )वंतु भिकान्या गावीत 22 ) युवराज पानसिंग रावताळे 23 ) फारुकबेग मोगलबेग मिर्झा 24 ) गणेश भिकाजी वसावे 25 ) कृष्णा पालाद पवार 26) वासुदेव प्रतापसिंग वसावे 27 ) सादीक शफिक शेख 28 ) प्रदीपसिंग देवनाथसिंग राजपुत 29) संजय भिमराव मराठे 30 )दिपक नामदेव पाटील 31 ) संजय चिंधू पाटील 32) रविंद्र रमेश पवार 33) विकास पिरन पवार 34) मुरारजी आलू वळवी
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमंलदारांचे देखील अडी-अडचणी व समस्या वेळेवेर सोडविल्या जातील तसेच गैर कायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!