बँड पथकाचे सादरीकरण व मास्क वाटप  करीत पोलीस अधीक्षकांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

नंदुरबार – 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतुन भारत मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून “अमृत महोत्सवी भारत” हा उपक्रम महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. म्हणून “अमृत महोत्सवी भारत” उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजीत केले जात आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांच्या उपस्थितीत “अमृत महोत्सवी भारत” या उपक्रमाचे औचीत्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना नविन वर्षनिमीत्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम शिवाजी चौक, नंदुरबार येथे आयोजीत करण्यात आला होता. कोरोना नियमांचे पालन करून नविन वर्षानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस बँड पथकातील पोलिसांनी बँड वाजविण्याचा कार्यक्रम करुन नागरीकांना शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरात बँड पथकासह संचलन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम योग्य ती परवानगी घेऊनच आयोजीत करण्यात आला होता.
“अमृत महोत्सवी भारत” या उपक्रमाचे औचीत्य साधून नविन वर्षाच्या शुभेच्छांसह 400 नागरीकांना पोलीसांतर्फे मास्क देखील वाटप करण्यात आले तसेच नागरीकांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे महत्व सांगून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पून्हा एकवेळा झपाट्याने वाढत असून काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
सदर कार्याक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार विभाग श्री. सचिन हिरे, नंदुरबार तहसिलदार श्री. भाऊसाहेब थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र भदाणे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र भावसार, इतर अधिकारी अमंलदार व जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!