नंदुरबार – चार दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शहादा शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे आगमन झाले म्हणून प्रचंड जल्लोषात शहादा वासियांनी काल दिनांक 8 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक काढली. परंतु कोरोना व ओमायक्रॉनच्या प्रसाराचे भान न ठेवता मनाई आदेशाचे व जमावबंदीचे ऊल्लंघन केले म्हणून या मिरवणुकीत सहभागी झालेल्या राजकीय पदाधिकारी, संघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांसह शेकडो जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
शहादा शहरात भाऊतात्या पेट्रोल पंप डोंगरगाव चौफुली ते शिवतीर्थ पावेतो सकाळी 11 पासून सायंकाळी 17.50 पर्यंत चाललेल्या मिरवणुकीत न भूतो न भविष्यती असा प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून आला. हिंदू-मुस्लीम बांधवांसह सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्रितपणे या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला.
तथापि शहादा येथील कोविड भरारी पथकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचे साहाय्याक तथा मंडळ अधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मकरंद नगीन पाटील, अभिजीत मोतीलाल पाटील, अनिल भिमराव भामरे, निलेश दत्तात्रे पाटील, अॅड, सरजु साहेबराव पाटील, रमाशंकर माळी, राजा उर्फ राजेंद्र दिलीप साळी, संजय चौधरी, अरविंद कुवर, किशोर साहेबराव पाटील, मुनेश जगदेव, गणेश रघुनाथ पाटील, सागर मगन मराठे, राजेंद्र अग्रवाल, सुनिल काशीनाथ पाटील, सुनिल पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, विनोद जैन, पंकज सोनार, संतोष वाल्हे, गोपाल गांगुर्डे, विजय पाटील, सुरेंद्र कुवर, हितेंद्र वर्मा, रुपेश कोळी, कार्तिक नाईक, कैलास युवराज सोनवणे, शिवाजी मोतीराम पाटील, श्याम जाधव, शुभम चौधरी, लाला पाटील, वैभव तांबोळी, मनिष चौधरी, दिनेश नेरपगार, सोनु पाटील (चहावाला), अप्पु पाटील, गुडडु पवार, आदीत्य डोडवे, सतिष मराठे, बबलु फेटेवाला तसेच इतर 100 ते 125 जणांवर भादवि कलम- 188,268,269, सह महा पोलीस का कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 135,112,117 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 बी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
डी.जे लावून ध्वनीप्रदुषण करुन तसेच फटाके फोडून जमाव जमवुन, आरडाओरडा करुन विनापरवागी मिरवणुक काढून सार्वजनिक शांततेचा भंग करीत जिल्हाधिकारी यांच्या कोरोना / ऑमिक्रॉन विषयक मनाई आदेशाचे व जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले व सार्वजनिक उपद्रव करतांना आढळले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
दुसरा गुन्हा या मिरवणुकी दरम्यान विविध वस्तू वाटप खाद्यपदार्थ वाटप करणाऱ्यांवर पोलीस कर्मचारी मणिलाल पाडवी यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला आहे. राजेंद्र भटुलाल अग्रवाल (व्यापारी मित्र परिवार) रा. वृंदावन नगर शहादा हे सी. एम हार्डवेअर जवळ शरबतचे स्टॉल लावून मिरवणुकील इसमांना शरबरत वाटप करीत होते, कु. भुषण प्रकाश रामराज रा शिक्षक कॉलनी शहादा हे अहिंसा चौक येथे पाणी बॉटल वाटप करत होते, संकल्प ग्रुप तर्फे श्री अक्षय छाजेड हे अहिंसा चौकात मास्क वाटप करत होते. बियर बार असोशिएअशन तर्फे काही इसम अहिंसा चौकात वडापाव वाटप करत होते. आर आर हार्डवेअर तर्फे राहुल सुगंदचंद जैन हे अहिंसा चौकात फ्रुटी वाटप करत होते. महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट तर्फे संतोष पंडीतराव महाजन हे बस स्टैण्ड गेटवर पोहे वाटप करत होते, गुजराती समाजातर्फे पिणाकीन कांतीलाल पटेल हे तुलसी लॉज जवळ मसाला ताक वाटप करत होते, शहादा तालुका व उत्पादक व वितरक महासंघ तर्फे मकरंद पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय प्रवेशद्वार येथे दूध वाटप केले. राजमुद्रा ग्रुप शहादा 007 फॅमिली तर्फे आदित्य डोडवे रा. श्रमिक नगर शहादा हे पोहे वाटप करत होते, श्री. राम राम गणेश मित्र मंडळ तर्फे राजपुत एस.बी आय चौकात शरबत वाटप करत होते. विश्व हिंदू महासंघ तर्फे साची गुजराती ही नारक आणि शरबत वाटप करत होती, दिनदयाल नगरपरिषद तर्फे प्रेस मास्ती गेटसमोर काही इस मसाला ताकचे वाटप करत होते. पटेल फास्टफुडजवळ काही इसम पाणी व शरबत वाटप करत होते. या माध्यमातून वरील सर्वांनी कोविड विषयक आदेशांचे ऊल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटलेे आहे.
तर तिसरा गुन्हा मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी धुळे येथील हिंदवी डी.जे मालक वैभव अनिल कुवर, रा, मालेगाव रोड, धुळे, आर. वन डी.जे. मालक निलेश हरिचंद्र चौधरी, रा.चैतन्य हाँस्पीटल जवळ यांच्याविरोधात दाााखल करण्यात आला. आवाजाची तिव्रता किती आहे हे डेसीबल (मशीन ) गनद्वारे चेक केले असता सदर मशीनचे स्क्रिनवर LAFmax 124.6 LAE 128.9 डेसीबल असल्याचे दिसून आले. म्हणून गुन्हा नोंदवण्यात आल्याचे म्हटले आहे.