पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व कृषि सल्ला (दि. १२ ते १६ जानेवारी, २०२२)

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व कृषि सल्ला दि. १२ ते १६ जानेवारी, २०२२

नंदुरबार जिल्हा:
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, *पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील. किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन थंडी कमी होईल.* किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

कृषिहवामान सल्ला

👉 जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पिकांना हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी.
👉 पपई, केळी फळपिकांना थंडीपासून संरक्षणासाठी प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे.
👉 जनावरांचे व कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करावे.

*विकास भारती ९०.८ रेडिओ केंद्र प्रक्षेपणाची वेळ:*
सकाळी १०:४० वा. आणि संध्याकाळी ४:४० वा.

*पिकनिहाय कृषिहवामान सल्ला व पशुपालनाविषयी* माहितीसाठी वरील हवामान आधारित कृषिसल्ला पञिका वाचावी.

👉 पुढील हवामान अंदाज व कृषि सल्ला दि. १४ जानेवारी शुक्रवारी देण्यात येईल.

(सौजन्य : जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!