नंदुरबार – येथील एस.ए. मिशन इंग्लीश मिडीयम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी क्रीडा दिनाचे औचित्यसाधून शाळेच्या मुध्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे, पर्यवेक्षक सबस्तीन यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर एस.ए. मिशन मराठी हायस्कूलच्या पर्यवेक्षक मीनल वळवी यांचाही उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून सन २०२०-२१ चा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी स्पोर्ट्सचे महत्व विषद केले. तीन C चे महत्व सांगताना त्या म्हणाल्या की, चरित्र, समाज, देश या तीन गोष्टींचा बंध स्पोर्टव्दारा साधता येतो. सांघिक कार्य, संयम, सकारात्मक विचार, कठोर परिश्रम या सर्व गोष्टी विद्यार्थी स्पोर्ट मधून शिकत असतो. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याविषयी माहिती देत त्यांना आदरांजली वाहिली. पर्यवेक्षक यांनी मेजर ध्यानचंद यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला व क्रीडा विषयी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सत्यजित नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी क्रीडा शिक्षक आशिष वळवी, अजय वळवी यांनी परिश्रम घेतले.