माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नंदुरबार – येथील हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या अधिनस्त असलेल्या सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, सौ.ताईसाहेब इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिर तसेच संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2022  रोजी शालेय प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अमळनेर विधान सभेचे माजी आमदार तसेच हिरा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष हिरालाल चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
ध्वजारोहणानंतर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी दरबार येथील प्रतिनिधी सेवेकरी सचिन माने, पांडुरंग हरकर, आनंद काळे, अरविंद अहिरराव, विश्वास धनगर, गजमल चव्हाण या मान्यवरांचा गुलाब पुष्प व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील पारंपारिक ऊर्जा स्त्रोत या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील तसेच चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी कु.सिद्धी सुभाष कोकणी, द्वितीय क्रमांक कु.प्रिन्सी राजाराम कोकणी, तृतीय क्रमांक कु.किमया मुकुंद चौधरी,
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.चंचल अभय सोनार, द्वितीय क्रमांक चि.सिद्धांत रमेश बच्छाव, तृतीय क्रमांक कु.अक्षदा इंद्रसिंग चव्हाण या यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी, संचालिका सौ.अनिता चौधरी, संचालक बलवंत जाधव, हिरा उद्योग समूहाचे संचालक प्रणव चौधरी, यश चौधरी तसेच संस्थेचे सचिव तथा काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी, सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र फटकाळ, श्री.काकासाहेब हिरालाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे इनचार्ज चंद्रकांत वाणी, सौ.ताईसाहेब इंदूबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी तसेच व पिना कपाटे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश पवार व श्रीमती चेतना चौधरी यांनी केले तर विशाल चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!