नंदुरबार – रस्त्यावरील भाजी विक्रेत्या श्रमिक भगिनींना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमातून सन्मानित करीत भारत मातेची प्रतिमा भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने येथे राबवला.
काल दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती शाखा नंदुरबार च्या महिला कार्यकर्त्यां कडून गिरीविहार गेट येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या श्रमिक महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भगिनींना वाण म्हणून भारत मातेची प्रतिमा तसेच मास्क देण्यात आले. यावेळी जनकल्याण समितीच्या उपाध्यक्षा सौ प्रितीताई बडगुजर यांच्यासह मोना सोमाणी, शिल्पा श्रॉफ, पूजा बडगुजर, सपना पाटील, सोनी डिसुझा, जॉली शहा या समितीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.