नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या नव्या संकेतस्थळाचे प्रजासत्ताकदिनी लोकार्पण

नाशिक –  नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक श्री. सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या नव्या संकेत स्थळाचे लोकार्पण काल दिनांक २६/०१/२०२२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक श्री. सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे जुने संकेतस्थळ हे संगणकावरच ओपन करण्याप्रर्यंत मर्यादीत होते. परंतु नुतनीकरण केलेले https://www.nashikruralpolice.gov.in हे संकेतस्थळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केल्याने ते मोबाईल, टॅब, आयपॅड यासारख्या उपकरणांमध्ये सहजपणे ओपन केले जावू शकते. तसेच त्यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. नुतनीकरण केलेले संकेतस्थळ हे नागरीकांना सहज हाताळणे योग्य लोकाभिमूख बनविण्यात आलेले आहे.
यापूर्वीचे संकेतस्थळ इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेले होते, आता नुतनीकरण केलेले नवीन संकेतस्थळ हे इंग्रजी व मराठी भाषेत तयार करण्यात आलेले आहे. यात नागरीकांना तक्रार व गोपनीय माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच नव्या संकेतस्थळावर जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस ठाणे तसेच विविध कार्यालय यांचे अधिका-यांचे फोटो व संपर्क क्रमांक व नजदिकच्या पोलीस स्टेशन माहिती तात्काळ उपलब्ध होवुन शकणार आहे.
लॉस्ट अॅण्ड फाउंड ( हरवलेले व सापडलेले) या टॅबवरून नागरीकांना अतिमहत्वाची वस्तु हरविल्यास किंवा सापडल्यास त्याबाबतची माहिती पोलीसांना तात्काळ घर बसल्या देता येणार आहे. तसेच सायबर काईमबाबतही ऑनलाईन तकार घर बसल्या देता येणार आहे.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग व सर्व नागरीक मोबाईल व इंटरनेटचा मोठया प्रमाणात वापर करीत असल्याने त्यांना त्याव्दारे नाशिक ग्रामीी पोलीस दलाचे संकेतस्थळ आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता सदर नुतनीकरण केलेले संकेतस्थळ निश्चीतच उपयोगी ठरणार असल्याने नागरीकांनी पोलीस कामकाजासाठी सदर संकेतस्थळाचा मोठया प्रमाणावर वापर करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण श्री. सचिन पाटील यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!