शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे रनाळे, शनिमांडळ, प्रकाशातील पाणी योजनांचा प्रश्न लागला मार्गी; 23 कोटींचा भरीव निधी मंजुर

नंदुरबार –  राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यातील माैजे शनिमांडळ, रनाळे तसेच शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत या गावांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देत या कामासाठी 23 कोटी 76 लाख 4 हजारांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून तसे शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हयातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेतृत्वाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जिल्हयातील देवस्थानांसह मोठी गावे म्हणून शनिमांडळ, प्रकाशा आणि रनाळेची ओळख आहे. मात्र या परिसरात पडणाऱ्या कमी पर्जन्यमानामुळे गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. या गावांतील पाण्याच्या मूळस्त्रोतातून नळ योजना सुरु केल्यास गावात पाण्याची समस्या मिटणार आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, आमश्यादादा पाडवी, शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक अण्णा गवते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेशदादा पराडके, रनाळा जि.प. सदस्य साै. शंकुतला सुरेश शिंत्रे यांनी गावचे सरपंच सौ. तृष्णा गवते, श्री. सुरेश शिंत्रे, याप्रमाणे शनिमांडळचे सरपंच योगेश मोरे, श्री. सयाजीराव मोरे जि.प. सदस्य श्री. मुन्ना पाटील मा.जि.प. सदस्य श्री. भाऊसाहेब पाटील या स्थानिक नेत्यांनी पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबईत भेट घेत त्यांच्या सोबत जल जीवन मिशन अंतर्गत या गावाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा अनुषंगाने मागच्या आठवडयात बैठक घेत निवेदन दिले होते.
याचीच दखल घेत या दोन्ही नेत्यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे आणि शनिमांडळ या गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुरी देत त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे. शनिमांडळ गावासाठी 06 कोटी 81 लक्ष 76 तर रनाळे गावासाठी 11 कोटी 29 लक्ष 02 हजार रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी या ग्रामस्थांना गुरुवार रोजी मंत्रालयात बोलावून प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय ग्रामस्थांना देवून दर्जेदार कामाच्या सुचना केल्या आहेत. याच प्रमाणे जिल्हयातील शिवसेना नेत्यांनी प्रकाशा येथील पाणी पुरवठा योजनेचा देखील पाठ पुरावा केला होता. त्यामुळे प्रकाशा गावच्या पाणी पुरवठा योजनेला देखील 05 कोटी 65 लक्ष 26 हजारांचा प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!