आता मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

नंदुरबार : शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन 15 ऑगस्ट पासून जिल्ह्यातील उपहारगृह, दुकाने, शॉपिक मॉल्स, जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योगसेंटर, सलून, इनडोअर स्पोटर्स व आस्थापना सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास मूभा देण्यात आली आहे. परंतू उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करतांना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृहात आस्थापनांनी लावणे आवश्यक असेल. उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह व बारमध्ये काम करुन शकतील. यासर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

वातानुकूलित उपहारगृह ,बार असल्यास वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक असेल. प्रसाधनगृहात उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील. उपहारगृह, बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.उपहारगृह व बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक राहील. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जासत रात्री 9 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!