नंदुरबार – नंदुरबार रेल्वे स्थानकानजिक 12993 क्रमांकाच्या गांधीधाम पुरी एक्सप्रेस च्या पॅन्ट्री कारला आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने रेल्वेस्थानकावरील जोडलेल्या पाईप लाईन मधून पाणी मारणे सुरू असल्यामुळे आग आटोक्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तातडीने आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला. हा डबा प्रवाशांचा नसल्याने कोणा व्यक्तीच्या जीविताची हानी झालेली नाही. खाद्यपदार्थ बनवणारी पॅन्ट्री कार (वातानुकुलित रसोई यान) ला आग लागल्याने हा प्रसंग उद्भवला. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर पँट्री कार वेगळी करण्यात आली. अद्याप 11.30 वाजता आग विझविण्याचे प्रयत्न चालू होते.