तळोदा – प्रशासनाने सूचना काढून देखील आणि कारवाई केली जात असताना देखील अनेक ऊस उत्पादकांकडून उसाचा विक्रमी लोड भरलेले ट्रॅक्टर आणि ट्रक दामटणे सुरुच आहे व उचकलेले ट्रॅक्टर दामटण्यासारखे विक्रमी प्रताप देखील घडवले जात आहेत. अशातच नियमबाह्य स्पीड ब्रेकरने या फूल लोडेड वाहनांच्या अपघातात भर घातली आहे. अशा कारणांनी तळोदा तालुक्यात एक विचित्र अपघात घडलेला पाहायला मिळाला. काही दिवसापूर्वी तापी पुलावरून पुढील चाक उचकलेल्या अवस्थेत ट्रॅक्टर धावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता या विचित्र अपघाताचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तळोदा तालुक्यात उसाच्या हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या उपयोग शेतकरी व कारखानदार करीत असून सदर ट्रॅक्टर वर क्षमतेपेक्षा जास्त टन ऊस भरलेले असल्याने व आधिच रस्त्यावर मोठमोठे खड्डे टाळण्यासाठी वाहन सांभाळावे लागते तर रस्त्याने जात असताना ट्रॅक्टर समोर येणारे नियमबाह्य बनवलेले गतिरोधक यामुळे ट्रॅक्टर दोन चाकावर उभे राहते व चालविणारे ड्रायवर च्या जिवावर बेतते रस्त्यावर होणा-या या थरार नाट्यमुळे पुढे व मागे येणारी वाहन चालकही घाबरल्या मुळे दुहेरी तिहेरी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील बायपास रस्त्यावर अशा घटना वारंवार होत असतात त्यामुळे मोठा अपघातहोण्याची
शक्यता नाकारता येत नाही. आज तालुक्यातील आमलाड जवळुन ऊसाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना गतिरोधक आल्याने जवळ एका साईटला उभे असलेले ट्रॅक्टर वर जाऊन आदळले सुदैवाने प्राणहानी वगैरे झाली नाही. यापुढे वरील प्रमाणे होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, टॅकटर मालकांना कारखानदारांनी सदर वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक यांना क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरण्याचे बंद करण्यात यावे अशा सूचना देण्यात याव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.