नंदुरबार- शहरातील मानाच्या काका गणपती मंडळातर्फे पंचधातु मिश्रित सोन्याचा मुलामा असलेली देखणी गणरायाची मूर्ती स्थापन करण्यात येणार असून आज दिनांक 31 जानेवारी रोजी या विलोभनीय मूर्तीचे नंदनगरीत आगमन झाले. मंडळाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग्राजवळील, अलिगड येथील मूर्ती कारखान्यातून सदर मूर्ती तयार करण्यात आली असून या मूर्तीचे वजन मुषकासह सुमारे 380 किलो आहे. मूर्तीचे आगमन होताच विधीवत स्वागत करण्यात आले. शुक्रवारी गणेश जयंतीदिनी काका गणपती मंडळातर्फे या विलोभनीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.