वाचकांचे पत्र:
सरकारीकरणामुळे मंदिरांची झालेली दुरावस्था !
आपण सर्व जाणतोच की मंदिरे ही धर्माची आधारशीलाच नव्हे तर ते चैतन्याचा स्त्रोत देखील आहेत. चर्चमध्ये बायबल आणि मशिदीमध्ये कुराण शिकवले जात असेल, तर मंदिरांमध्ये भगवद्गीता शिकवली का जात नाही ? असा प्रश्न येथे उपस्थित करावासा वाटतोय. ही तथाकथित सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला तडा जाणारी गोष्ट आहे. कायद्यात बदल करून मंदिरातून सुद्धा धर्मशिक्षण देण्यात यावे नाहीतर सर्वधर्मसमभाव बाळगणारा धर्मनिरपेक्ष भारत कसा होईल? प्राचीन काळी राजे-महाराजे मंदिरे बांधत असत, त्यांचा जीर्णोद्धार करीत असत. मंदिरांच्या व्यवस्थेसाठी भूमी दान आणि धन अर्पण करत असत. सध्या निधर्मी व्यवस्थेच्या नावाखाली मंदिरांची लूट चालू आहे. व्यवस्थापन सुधारणेच्या नावाखाली सरकारने फक्त मंदिरे ताब्यात घेतली; त्यामुळे मंदिरांची अवस्था अतिशय वाईट झालेली दिसत आहे. मंदिरांतून हिंदु धर्माचा प्रचार व्हावा, समाजाला धर्मशिक्षण मिळावे त्याबरोबर मंदिर आणि संस्कृती रक्षणासाठी संघटितपणे राष्ट्रव्यापी जागृती होणे आवश्यकता आहे असे वाटतेय.
– डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ