नंदुरबार – भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, महाराष्ट्र शासनाचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नंदुरबार जिल्हा परिषद आणि नंदुरबार येथील ‘नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल हिरा एक्झिक्यूटिव्ह येथे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात नंदुरबार तालुक्यातील आसाणे , सुतारे, श्रीरामपूर, न्याहली, दापुर, मांजरे, पिंपरी, तसेच नवापुर तालुक्यातील लहान कळवण, बोरपाडा, खोकसा ,कामोद, केळी तर दुसऱ्या टप्प्यात नंदुरबार तालुक्यातील कोठली खु. हरिपूर जळके, बाल आमराई,वडझाकण, ढेकवद , ठाणेपाडा, नवागाव, केसरपाडा , वाघाळे, अजयपुर, शिरवाडे या गावातील प्रत्येकी पाच सदस्यांना विविध प्रशिक्षकांच्या माध्यमातून क्षमतावृद्धी प्रशिक्षण देण्यात आले.
यात पाण्याचे नियोजन, पाण्याचा स्रोत, प्रकटीकरण, जल जीवन मिशन ची संकल्पना, पारंपारिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, पाणी पुरवठा नळकनेक्शन त्याचे फायदे, परिणाम समजावून सांगण्यात आले त्याचबरोबर जल जीवन जीवन मिशन अंतर्गत मिळणार्या वेगवेगळ्या संधी, ग्रामपंचायतची भूमिका, जबाबदाऱ्या, सरपंच, पाणी समिती सदस्य आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य यांच्या भूमिका पाणी गुणवत्तेचे महत्त्व, सहभागी संसाधनांचा वापर, PRA ,PLA पद्धतीने सहभागी नकाशा संसाधन नकाशा, पाणी संसाधन नकाशे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे अंदाजपत्रक, गावातील पाणी पुरवठा सेवासुविधा यावर मार्गदर्शन देण्यात आले.
प्रत्येक माणसाला 55 लिटर पाणी नळाद्वारे मिळावे म्हणून त्याचे नियोजन जल जीवन मिशनच्या माध्यमातून कसे करावयाचे हे दाखवण्यात आले. या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एक दिवसाची अभ्यास सहल नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर व आसाणे येथे नेण्यात आली. याठिकाणी सर्व कुटुंबांना नळ कनेक्शनमार्फत कसा पाणी पुरवठा केला जात आहे, त्या सुविधांची तसेच स्त्रोत बळकटीकरणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती उपस्थित सदस्यांनी घेतली. तसेच गावातील पाणी समितीचे कामकाज, देखभाल-दुरुस्ती या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी बांधकाम गुणवत्ता गावातील सार्वजनिक काम सुरू असताना ,गुणवत्ता व पारदर्शकता असावी ,या गोष्टीकडे पाणी समिती व गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ,त्याचबरोबर अभ्यास सहल दरम्यान पाणी करण्यात आलेल्या निरीक्षणाने विषयी गट चर्चेद्वारे सादरीकरण करण्यात सादरीकरण करण्यात आले ,सदर चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी यशदा प्रशिक्षित प्रशिक्षक श्रीमती छाया भट, दिनेश पाटील, सृष्टी कन्स्ट्रक्शनचे मंदार वैद्य, वैशाली म्हस्के, प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, जिल्हा परिषदेचे पाणी गुणवत्ता तज्ञ नितिन पाटील, कार्यकारी अभियंता पांडुरंग दरेवार सरपंच असाणे नवनिर्माण संस्थेचे प्रशिक्षक रवी गोसावी, राजेश ईशी, पाणी फाऊंडेशनचे तात्याराव भोसले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे गौतम शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, प्रकल्प संचालक राज्य पाणी व स्वच्छता मिशन रविद्र शिंदे, विजय गवळी, डॉ. वर्षा फडोळ प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद नंदुरबार, मनुष्यबळ विकास तज्ञ विशाल परदेशी आदींनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवनिर्माण संस्थेचे श्री संजय वळवी ,भूमिका भगत, मनीषा पाडवी, कौशल्य चौरे, पूजा शर्मा ,भूषण साळुंके, दिलीप पावरा आदींनी परिश्रम घेतले