नंदुरबार – शहरातील नवा भोईवाडा भागातील बालवीर चौकात शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेश जयंती निमित्त महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नंदुरबारसह राज्य आणि देशातून कोरोना मुक्ती व्हावी यासाठी मंडळातर्फे विघ्नहर्ता गणरायाला साकडे घालण्यात आले.
माघी गणेश जयंती निमित्त शहीद शिरिषकुमार मित्रमंडळातर्फे बालवीर चौकात गणरायाच्या भव्य प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे आणि सौ. नंदा हिरणवाळे या दांपत्याच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेची महाआरती करण्यात आली. महाआरती नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. लाडक्या गणपती बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त बाल गोपाळांनी भक्ती गीतांच्या तालावर ठेका धरला. कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, प्रा. एकनाथ हिरणवाळे,आकाश जवेरी, सिद्धेश नागापुरे, प्रफुल्ल राजपूत, दिलीप कुंभार, नरेंद्र हिरणवाळे, राजेंद्र सोनवणे, आदींसह परिसरातील भाविक उपस्थित होते.