महिला आयोग अध्यक्षांपाठोपाठ अनुसूचित आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सदस्यांचेही दौरे; प्रशासनात धावपळ

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या पाठोपाठ राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान, सदस्य अनंत नायक यांचेही दौरे जाहीर झाले असून दि.10, 11 आणि 12 फेब्रुवारी असे तीन दिवस प्रशासनाची धावपळ राहणार आहे. अशातच विशेष महा निरीक्षकांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्शन होत आहे.
ये दोऱ्यांचे स्वरूप असे की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. गुरुवार 10 फेब्रूवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता साक्री येथून नंदुरबार कडे प्रयाण.  दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जनसुनावणीस उपस्थिती.  दुपारी 2.00 वाजता पत्रकार परिषद.  दुपारी 2.30 वाजता राखीव.  दुपारी  3.00 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय नंदुरबार.  दुपारी 3.30 वाजता नंदुरबार शहर आढावा.  सायंकाळी 5.00 वाजता नंदुरबार येथून जळगांवकडे प्रयाण करतील.
याच पाठोपाठ राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य अनंत नायक  हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. श्री.नायक यांचा दौरा असा : शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 19.55 वाजता सुरत येथे आगमन व मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 23 वाजता नंदुरबार येथे आगमन व  शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. शनिवार 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आयोजित 56 व्या परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर,नंदुरबार ) दुपारी 13.30 वाजता राखीव व भोजन. दुपारी 15.30 वाजता मौजे तलावीपाडा ता.नवापूर व मौजे खांडबारा ता.नवापूर येथे भेट. सायंकाळी 17 वाजता नंदुरबार शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. रविवार 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजता नंदुरबार येथून जव्हारकडे प्रयाण करतील.
शिवाय अनुसूचित जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान हेही नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अनुसूचित जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष  हर्ष चौहान नवी दिल्ली हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. शुक्रवार 11 फेब्रूवारी 2022 रोजी रात्री 19.55 वाजता सुरत (गुजरात)  येथे आगमन व मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण.  सोईनुसार नंदुरबार येथे हॉटेल हिरा एक्सीकेटीव्ह/ शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. शनिवार 12 फेब्रूवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नंदुरबार येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे आयोजित 56 व्या परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थितीत.   सोईनुसार नंदुरबार येथून मोटारीने सुरतकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!