पीडित महिलांनी जनसुनावणीला उपस्थित रहावे, अभिजीत मोरे यांचे आवाहन; शरद युवा संवाद यात्रा ऊद्या नंदुरबारला, तीन दिवस मेळावे

नंदुरबार  – पूर्वी अर्ज केलेले असो अथवा नसो सर्व पीडित महिलांनी दाद मागण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत ऊद्या दि.10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनसुनावणीला आवर्जून उपस्थित रहावे तसेच प्रत्येक तालुक्यात आयोजित केलेल्या मेळाव्यांत संवाद साधण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी केले.
आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा एडवोकेट अश्विनी जोशी, शहराध्यक्ष नितीन जगताप, प्रकाश भोई, हंसा अहिरे, कांचन मोरे, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, चिटणीस जितेंद्र कोकणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शासकीय दौरा आणि पक्षीय कार्यक्रम वेगवेगळे राहणार आहेत. गुरुवार 10 फेब्रूवारी 2022 रोजी 11.30 वाजता साक्री येथून नंदुरबारला येतील. पक्षीय आढावा घेतील त्यानंतर  दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जनसुनावणीस उपस्थिती.  दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद.  दुपारी 2.30 वाजता राखीव.  दुपारी  3 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय नंदुरबार.  दुपारी 3.30 वाजता नंदुरबार शहर आढावा.  सायंकाळी 5 वाजता नंदुरबार येथून जळगांवकडे प्रयाण करतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शरद युवा संवाद यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ही यात्रा नंदुरबार जिल्ह्यात दाखल होत असून दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी त्यानिमित्त तालुकानिहाय युवकांशी संवाद साधण्यासाठी दि.11 ते 13 फेब्रुवारी 2022 असे सलग तीन दिवस युवक मेळावे होणार आहेत, अशी माहिती डॉ.अभिजीत मोरे यांनी दिली.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पहिल्या टप्प्यात दि.5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरातील 358 तालुके व 27 महानगरांमध्ये शरद युवा संवाद यात्रा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे दि.11 ते 13 फेब्रुवारी 2022 असे तीन दिवस नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येवून शरद युुवा संवाद यात्रेतून युवकांशी संवाद साधतील. तसेच युवकांचे संघटन, पक्ष बांधणी, गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची युवक शाखा व आगामी निवडणूकांविषयी आयोजित युवक मेळाव्यांतून मार्गदर्शन करतील. दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता शरद युवा संवाद यात्रेचे नंदुरबार येथे आगमन होईल. नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालय याठिकाणी दि.11 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान युवक मेळावा, सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेदरम्यान तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात युवक मेळावा होणार आहे. तसेच दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेला अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी याठिकाणी युवक मेळावा, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान धडगाव येथील बाबा चौकात युवक मेळावा होणार असून सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेदरम्यान शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील गॅस गोडावुनजवळ युवक मेळावा होईल. दि.13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत नवापूर येथील अग्रवाल भुवन याठिकाणी युवक मेळाव्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे युवकांशी संवाद साधतील. या यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात शरद युवा यात्रेेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येईल, असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!