नंदुरबार – डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे आज सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी माता-पिता पूजन कार्यक्रम व सभागृह नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सभागृह नामकरण सोहळा, 75 करोड सूर्यनमस्कार शाळा गौरव, माता पिता पूजन आणि योगगुरु प्रज्ञाताई यांचा गौरव, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. आश्रमशाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वविक्रमी योग प्रशिक्षक प्रज्ञा पाटील या उपस्थित राहणार आहेत.
योगगुरु श्रीमती प्रज्ञा पाटील यांचा परिचय
श्रीमती प्रज्ञा पाटील यांनी 16 जुन 2017 ते 20 जुन 2017 दरम्यान 57 तास 2 मिनीटे योगा करण्याचा विश्वविक्रम केला. यामुळे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमधे नोंद झाली आहे. 2012 मध्ये आरोग्य समस्येमुळे त्या योग या क्षेत्राकडे वळल्या. 2013 मध्ये योगात एमए पी.एच.डी. पूर्ण केले. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. 2015 मधे योगा राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. यासह विविध प्रतिष्ठित स्तरावरील विविध पुरस्कारही प्राप्त केलेे आहेत व एक लाख विद्यार्थी आणि 5000 ज्येष्ठांना मोफत योग शिकवीत आहेत.